आतापर्यंत झालेली आणि चालू असलेली महत्त्वाची कामे.
- मतदारसंघातील गरजू लोकांसाठी जयंत पाटील अन्न धान्य योजनेअंतर्गत ४/४/२०२२ पासून १२३+ कुटुंबीयांना आपण दरमहा राशनचे किट पूर्वत आहोत.
- मतदारसंघातील ७६२+ महिलांना सुप्रिया सुळे संरक्षण योजनेअंतर्गत दरमहा मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करत आहोत.
- उत्तम आरोग्य आणि निरोगीपणासाठी मतदारसंघात वेळोवेळी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.
- २५७+ महिलांना मोफत दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
- पक्षात ४४६+ नवीन सभासद नोंदणी करून ऍक्टिव्ह मेंबर बनविण्यात आले.
- वार्ड क्रमांक २ मधील ३२८६+ मतदारांचे सामाजिक काम आत्तापर्यंत करण्यातआले आहे आणि चालू आहे.
- वार्ड क्रमांक २ मधील एकूण ३८६ सोसायटी मधून २७२ सोसायटीचे काम आतापर्यंत करण्यात आले आहे.
- मतदारसंघात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जोडणी सुरू करून पाण्याचे प्रश्न सोडवले.
- कोविड काळात मतदारसंघात जागोजागी मोफत सॅनिटायझेशन करण्यात आले.
- मतदारसंघातील मूलभूत गरजा कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात.